अंताजीची बखर’ : एक ऐतिहासिक कादंबरी,वेगळ्या दृष्टिकोणातून
अंताजीची बखर ही बखरीचा घाट दिलेली कादंबरी अर्थात् ही ऐतिहासिक कादंबरी आहे. तिच्यात खरा इतिहास आहेच, पण थोड्या वेगळ्या दृष्टिकोणातून पाहिलेला आहे. ही आगळी दृष्टी हेच या कादंबरीचे मुख्य वैशिष्ट्य. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे इतिहास मराठ्यांचाच पण प्रकाशझोत वेगळ्या क्षेत्रावर टाकला आहे. कादंबरीच्या अर्पणपत्रिकेचा उपयोग एखादा पताकास्थानासारखा करून लेखकाने आपल्या दृष्टिकोणाचा परिचय करून दिला आहे. अर्पण …